Tuesday, 25 May 2021

बप्पीदा के अमृत वचन- (भाग-1) - 12th Sep-2020

 मित्रांनो, सध्या जे काही ज्या पद्धतीने सुरू आहे त्यावर सातत्याने लिहावेसे वाटत आहे. म्हणून एक सिरीज सुरू करत आहे जी तुम्हाला थोडी हसवेल, किंचीत रडवेल किंवा विचार करायला भागही पाडेल.

यावर तुमचा अभिप्राय कळवत रहा. तुमच्या प्रतिसादाने ही सिरीज वाढू व फुलू शकते.
                                        "बप्पीदा के अमृत वचन- (भाग-1)"
आज खऱ्या अर्थाने कळलं की योगा का करतात.
कुठलंही उच्चकोटीचं ड्रग घेतल्यानंतर त्याचा शरिरावर वाईट परिणाम होऊ नये म्हणून योगा करतात. खास प्रसंगी जसं 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' या दिवशी वेगवेगळ्या वाहिन्यांवर येऊन योगा केल्याने बाह्य रूप कसे 'टकाटक' राहते (कारण जनता तेच पाहते, आतून भलेही ड्रग्जने शरिराची नासाडी केली असेल तरी) हे अधोरेखित करण्यासाठी योगा करतात. 'इंस्टाग्राम', 'फेसबूक', 'ट्विटर' च्या गरिब मालकांचा उदरनिर्वाह सुरळीत व्हावा यासाठी हातात घेतलेली मोहीम म्हणजे योगा होय. आज मिडीयाच्या माध्यमातूनही योगाचा प्रचार सुरू आहे. कोणी स्वरयंत्राचा योगा करत आहे कोणी आपल्या मानेचा तर कोणी आपल्या हाता-पायांचा.
असो. सध्या अजून 2 योगींची (दिल्लीतील नव्हे, कृपया गैरसमज टाळावेत कारण सध्या ते 'टिड्डी' सारखे वाढत आहेत) नावे समोर आली आहेत. पोह्याच्या ताटातील 2 शेंगदाणे म्हणू शकता. अजून कांदे, मिरच्या, नासलेलं.... I mean किसलेलं खोबरं वगैरे बरंच काही बाहेर यायचय.
त्या बिचार्या दरमहा 17 हजाराचा घराचा हप्ता भरणाऱ्या मध्यमवर्गीय पोरीला तिचे जातभाई म्हणत असतील "बाई करायला गेली एक नाउ लेट्स टेक अ ब्रेक."
P.S.
1) माझा EMI हिच्यापेक्षा जास्त जातो पण मी देखील मध्यमवर्गीयच आहे याची नोंद घ्यावी.
2) या सिरीजकडे केवळ एक सरकॅजम म्हणून पहावे. धार्मिक किंवा राजनैतिक ऑर्गेजम येऊन आपल्या म्यानातील तलवारी ईथे बाहेर कढू नयेत ही नम्र विनंती!
#Rhea#SaraAliKhan#RakulpreetSingh#मुझे ड्रग्ज दो

No comments:

Post a Comment

कुतूहल Express (उर्फ गार्गी)" Episode-8: "अ बॅलेंस्ड ॲक्ट" (- 25th May'21)

  शाळेची पहिली पायरीच 'वर्क फ्रॉम होम' ने चढल्यामुळे घरी पालकच मुलांचे सर्वेसर्वा असतात. मुलांचा अभ्यास घेणे, त्यांना शिस्त लावणे (क...