Tuesday, 25 May 2021

"कुतूहल Express (ऊर्फ गार्गी) Episode-2

चायनाच्या उद्योगांमुळे "Undercover Agent" होण्याचं सर्वांना भाग्य लाभलं. कलाकार मंडळी या काळात काय काय करत आहेत याचा आढावा एक न्यूज चॅनल घेत होतं. त्यामध्ये चि. सौ. कां. कॅटरीना कैफ भांडी कशी घासावीत याचं प्रात्यक्षिक देत होती. ऊगाच गार्गीला डिवचायचा छंद उफाळून आला. मग पुढील प्रसंग असा होता:

मी: गार्गी, ती बघ भांडी कशी घासायची शिकवतीए. किती छान आहे ना ती?
गार्गी: हो!
मी: आणायचं का तिला आपल्या घरी भांडी घासायला?
गार्गी: (अगदी हसत खूष होऊन) हो आणू!
पगलीने आंसू ला दिए मेरी आंखोंमें 🙂

No comments:

Post a Comment

कुतूहल Express (उर्फ गार्गी)" Episode-8: "अ बॅलेंस्ड ॲक्ट" (- 25th May'21)

  शाळेची पहिली पायरीच 'वर्क फ्रॉम होम' ने चढल्यामुळे घरी पालकच मुलांचे सर्वेसर्वा असतात. मुलांचा अभ्यास घेणे, त्यांना शिस्त लावणे (क...