Tuesday, 25 May 2021

बप्पीदा के अमृत वचन (भाग-2): "हॅलोवीनला तात्या विंचूची सप्रेम भेट" - 5th Nov-2020

चला, महाराष्ट्रात हॅलोवीन ४ नोव्हेंबरला "तात्या विंचूला" अटक करून एकदाचं साजरं करण्यात आलं. यामुळे "धृतराष्ट्राच्या" भावी पिढ्यांवर नक्कीच शोककळा पसरली असेल पण निदान पुढचे १४ दिवस तरी कानांना त्यांचे नैसर्गिक काम सुरळीतपणे करता येईल. गेले कित्येक महिने किटलेल्या कानांचं ''सर्विसिंग" या काळात करता येईल. गेले कित्त्येक महिने सुशांतच्या नावाची पाटी लावून जे दुकान मांडण्यात आलं होतं ज्यामध्ये 'सिजनल आयटम्स' ची सतत भर पडत जात होती त्याला कुठेतरी चाप बसेल. नंतर 'बिग बॉस' या प्रकरणाचा सुरेख फायदा उचलतील हा भाग अलहिदा!

असो. वृत्तवाहिन्यांनी आपले चापलूस घोडे किती दौडवावेत याचा विचार करण्याची वेळ आता खरोखरचआली आहे.लोकांचे कान (आणि बुद्धीही )शाबूत ठेवण्याचा "कानमंत्र" कानाखाली जाळ काढल्यावर मिळाला असेल अशी आशा बाळगूयात अन्यथा कानी-कपाळी ओरडूनदेखील ते या कानाने ऐकलं जायचं आणि त्या कानाने सोडून दिलं जायचं. तरी नेहमी मी त्याला सांगायचो की "बावळ्या, सारखं ड्रग्स मागू नकोस, अडकशील कधीतरी". आता झाली ना पंचाईत!!
आता याच्याव्यतिरिक्त कोणाला ते स्टुडिओमधलं "टेबल" (कोकलून कोकलून) बडवायची सवय आहे सांगा बरं?? झालं ना ते "टेबल" आता काही दिवसांसाठी तरी बेरोजगार (आणि त्याचे साथीदार गपगार). आधीच बेरोजगारी कमी आहे का ज्यात त्या बापड्या टेबलची भर घातली? तो गरागरा सायकल फिरवणारा बातमीदार आणि त्याच्या गिरक्या टिपणारा कॅमेरामॅन यांना कोण बरं आता समुपदेशन करेल? तिकडे तो ट्रम्प जगतोय की कोलमडतोय यासारखी महत्वाची बातमी दार ठोठावत असताना ऐन धंद्याचा टाईम खोटी करून बसलास. बिहार निवडणुकांना त्या "स्थिर घोडेस्वार विरांगणे" शिवाय या उच्चकोटीच्या शिलेदाराचीही केवढी गरज होती. आता बसली ना बिनपगारी सुट्टी (Unpaid Leave)!! तसं तू पुन्हा रुजू झाल्यावर बोनससकट सगळं नुकसान भरून काढशील यात वादच नाही म्हणा.
असो. २ आठवडे तू ही तुझ्या स्वरयंत्राचं "सर्विसिंग" करून घे. भावी कट-कारस्थानं लिहायला निवांत वेळ मिळालाय असं समज म्हणजे आनंदात निघून जाईल तुझा वेळ.
#ISupportMyEars#ISupportMyMentalPeace

No comments:

Post a Comment

कुतूहल Express (उर्फ गार्गी)" Episode-8: "अ बॅलेंस्ड ॲक्ट" (- 25th May'21)

  शाळेची पहिली पायरीच 'वर्क फ्रॉम होम' ने चढल्यामुळे घरी पालकच मुलांचे सर्वेसर्वा असतात. मुलांचा अभ्यास घेणे, त्यांना शिस्त लावणे (क...