Tuesday, 25 May 2021

कुतूहल Express (उर्फ गार्गी)" Episode-7: "महाराज कंसांचे जन्मस्थान" (- 6th May'21)

 पोरं-बाळं (एक भी काफी होता है!) एकदा झाली की तुमच्या मालमत्तेमधला एक मोठा घटक तुम्ही ऑलरेडी गमावून बसलेले असता. तो म्हणजे "टि.व्ही." आणि त्याचं वारंवार हरवणारं लेकरू म्हणजे "रिमोट". कार्टून चॅनेल्स दिवसभर कार्टून्सचं अविरत रतीब घालत असतात आणि घरातली चिल्लर पार्टी बुडाला मुंग्या येऊन त्या आपल्या घरी निघून गेल्या तरी जागचे हालत नाहीत.

लॉकडाऊन म्हणून बुड सदा डाऊन.
IPL सुरू झालं तरी माझ्या लेकीला माझ्यावर दया नाही आली हो! धोनी...कोहली...बूमराह..जडेजा सोडून मी नोबिता...डोरेमॉन...शाकाल...शिवा...मोटू-पतलू... बघत बसलो होतो. शेवटी वैतागून हॉटस्टारला मिठी मारली.
या कार्टून्सचा प्रामाणिकपणे सांगायचा तर एक फायदा मात्र मला नक्कीच झाला. माझ्या मिमिक्रीच्या ताफ्यात आणखी काही कार्टून कॅरॅक्टर्सची भर पडली.
असो. काल गार्गी "किसना" कार्टून बघत होती. त्यामध्ये महाराज कंस हा कृष्णाचा वध करण्याकरिता पूतना राक्षसीला गोकुळात पाठवतात. त्यावेळेस गार्गी सोबत घडलेला संवाद.
मी: "कोण आहे गं ती?"
गार्गी: "ती ना लाक्शस आहे. महाराज कंसनी क्लूष्नाला
मालायला पाठवलय. मग क्लूष्ण तिला जोलात ढिशूम-ढिशूम कलतो."
लेकीचं जनरल नॉलेज पाहून बाप एकदम प्रभावित ना!! 😎
मग काय, तिचा सखोल अभ्यास अजून जाणून घेण्यासाठी मी लागलीच तिला विचारलं:
मी: "कोण गं महाराज कंस?"
गार्गी: "तो नाही का "लिटिल सिंघम" मध्ये असतो, तो."
आणि आमच्या तळहाताने आमच्या ललाटास चुंबन दिले.🤦
तरी मी पिल्लूला पौराणिक पात्रांची... देवी-देवतांची ओळख करुन देत असतो. ती शिव स्तुती "कर्पूर गौरम" खूप गोंडसपणे म्हणते. ते अजून थोडं पॉलिश करून मग त्याचा विडिओ अपलोड करेन.
तोपर्यंत... उघडा डोळे...पहा नीट...कार्टून चॅनेल्स...अजून काय 🕵‍♂️

No comments:

Post a Comment

कुतूहल Express (उर्फ गार्गी)" Episode-8: "अ बॅलेंस्ड ॲक्ट" (- 25th May'21)

  शाळेची पहिली पायरीच 'वर्क फ्रॉम होम' ने चढल्यामुळे घरी पालकच मुलांचे सर्वेसर्वा असतात. मुलांचा अभ्यास घेणे, त्यांना शिस्त लावणे (क...