जशी "बिना त्रिपाठी" वहिनींची खंत असते तशीच माझी काल झाली. पण अर्थातच पावसाबाबत!
"गर्म करके गर्म ही छोड दिया" शहाणा नुसता येण्याचा आव आणून आमचं तंदूर बनवून बरसलाच नाही. पण आजमात्र त्याने दमदार हजेरी लावली.
त्यावेळेस गार्गी आणि माझ्यात झालेला संवाद!
मी: पिल्लू, ढग बघ कसे गडगडत आहेत. पाऊस येतोय बघ आज.
गार्गी: ढग येताहेत.
मी: अगं ढग आहेत ते गडगडत आहेत म्हणून पाऊस येणार आता.
गार्गी: त्यांच्या पोटात गुडगुडत असेल.
मी:
बारक्यांचं कल्पनाविश्व अफाट असतं. कधी एखादी गोष्ट दुसरीकडे रिलेट करतील याचा नेम नाही
No comments:
Post a Comment