Friday, 22 March 2013

" साकडं हिमेशबाबांना.... "





माईक कोंबूनी, नासिकेतूनी, कोल्ह्याची कुई-कुई थांबवा हो
पडदे फाटले कानामधले, आता तरी "पडदा" टाका हो






कुंपणरुपी दाढी आपूली, कधीतरी शेत नांगरा हो
किटले अमूचे कान बिचारे, गाणं 'भुंकणं' थांबवा हो

काळोखातून येऊन टोपी घालोनी, दमदाटी थांबवा हो
पकली सारी जनता तुम्हास, किती "टोप्या" घालाल हो

चार शब्दांचे गाणे आपले, तेच-तेच काय वापरताय हो
संगीताच्या साधनेचा अवमान कशास करताय हो

तुटले असेल जरी हृदय तुमचे, कितीवेळा तेच मिरवाल हो
मुडदूसाचा रुग्ण बनूनी गौळणींमध्ये किती ड़ूलाल हो




नव्या नवरीचे जसे नौ दिवस, तशीच तुमची गत होणार हो
पुढे सिग्नलवर चार आणेसुद्धा, तुम्हास कोणी देईल का हो






म्हणून सांगतो वेळीच ऐका, नका घेऊ संगीताशी वाकडं
शेंबड्या "हिमेशबाबांना", आमचं एवढंच एक साकडं ..... एवढंच एक साकडं ....... एवढंच एक साकडं ....


                                          ♥
 सुरज 

No comments:

Post a Comment

कुतूहल Express (उर्फ गार्गी)" Episode-8: "अ बॅलेंस्ड ॲक्ट" (- 25th May'21)

  शाळेची पहिली पायरीच 'वर्क फ्रॉम होम' ने चढल्यामुळे घरी पालकच मुलांचे सर्वेसर्वा असतात. मुलांचा अभ्यास घेणे, त्यांना शिस्त लावणे (क...