Wednesday, 20 March 2013

"एका जिवलग मैत्रिणीस..."


नाहीस तू एकटी, या भवसागरात,
सांग सारं काही, जे आहे तुझ्या मनात
असेल विश्वास जर माझ्यावर,
तर कशाला ताबा, तुझा मनावर

तुझ्या डोळ्यातील दवबिंदु कोणासाठी?
या स्वर्थी, ढोंगी लोकांसाठी?
तुझ्या मनाची तळ्मळ कशासाठी?
भ्रामक, काल्पनिक सुखासाठी?

स्वतःची अशी छळवणूक करु नकोस
या एकटेपणाला, ऊगाच भिऊ नकोस
तुझा संयम, धैर्य सोडू नकोस
दुसर्‍यांसाठी स्वतःला तू बदलू नकोस

विसर तुझे हे एकाकीपण
वेच आनंदाचे अनमोल क्षण
तुझे निर्मळ हास्य ठेव जपुन
जसा मेघांमागे दडला वरुण.


~~~~~~~~~~~ सुरज ~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment

कुतूहल Express (उर्फ गार्गी)" Episode-8: "अ बॅलेंस्ड ॲक्ट" (- 25th May'21)

  शाळेची पहिली पायरीच 'वर्क फ्रॉम होम' ने चढल्यामुळे घरी पालकच मुलांचे सर्वेसर्वा असतात. मुलांचा अभ्यास घेणे, त्यांना शिस्त लावणे (क...