नजरांच्या या दुनियेत, एक नजर जन्माला आली,
तेव्हापासून त्या नजरेचा, एक नवा शोध सुरु झाला,
शोध "त्या नजरेचा", जी त्याची नजर समजून घेईल
त्याची नजरच काय, त्याचं अंतरंग जाणून घेईल
प्रत्येक नजरेत ती नजर, "त्या" नजरेचा शोध घेई
नव-नव्या नजरांना ती नजर, नीट तपासून पाही
पण प्रत्येक नजरेमध्ये, काहीतरी अपूरंच राही
मग त्या नजरेस वाटे, "ती नजर" कुठेच नाही?
धडपडून, ठेचकालून शेवटी "ती नजर" त्या नजरेस सापडली
क्षणात "त्या नजरेने", या नजरेची दुनियाच बदलून टाकली
सुख-दुःखे व स्वप्ने त्याची, त्या नजरेतच विसावली
संकटेदेखील हसत-हसत त्याने, "त्या नजरेमुळे" परताविली
"त्या नजरेने" दिला त्यास, नवा आत्मविश्वास व ऊभारी
वाटे त्यास आयुष्याने, जणू घेतली आहे ऊंच भरारी
त्या दोन नजरा, एकमेकांशी खूप बोलायच्या
क्षणात कधी हसायच्या, तर क्षणात रडायच्या
कधी-कधी रोष "त्य नजरेचा" त्यास पत्करावा लागे
पन ओलावा होता त्या नजरेंचा, नव्हते ते कच्चे धागे
क्षणिक तो राग असे, पुन्हा नजरा बोलू लागे
दोन त्या नजरांचे खरंच होते निर्मळ नाते
पण बाकीच्या नजरा, त्या दोन्ही नजरांकडे पहायच्या
म्हणून "त्या दोन नजरा", विनाकारण घाबरायच्या
नजराच त्या, त्यांनाही वेदना व्हायच्या
तरीही त्या नजरा एकमेकांना, जीवापाड जपायच्या
वाटा मात्र त्या नजरांच्या, होत्या एकदम भिन्न
येणारा दुरावा, त्या नजरेंची मनं करणार होता खिन्न
अखेर उजाडलाच तो दिवस, त्या नजरांचा दूर जाण्याचा
एकमेकांच्या नजरेत स्वतःला, "शेवटचं " पाहण्याचा
जाता-जाता मात्र, दोन्ही नजरा पाणावल्या होत्या
भुतकाळात सहजच पाह्ता, "त्या" नजरांच्या आठवणी ताज्या झाल्या होत्या.....आठवणी ताज्या झाल्या होत्या...
♥♥♥♥ सुरज ♥♥♥♥