नाना पाटेकर....माझ्या शालेय जीवनात या नावाचं खूप मोठं स्थान आहे. 'मिमीक्री' या प्रकाराची आणि माझी पहिली-वहिली ओळख 'नानांच्या' रुपाने झाली. नववीत आपल्याला एखाद्या अभिनेत्याचा (बऱ्यापैकी) आवाज काढता येतो याचं केवढं अप्रूप होतं तेव्हा. पुढे 'नाना' हे माझं दैवत बनतील याची त्या अल्लड वयात पुसटशी कल्पनादेखील नव्ह्ती. 'माफ़ीचा साक्षीदार', 'अंकूश', 'प्रहार', 'क्रांतीवीर', 'युगपुरुष', 'खामोशी', 'अब तक छप्पन', 'यशवंत', 'दस कहानीयॉं मधील मेघना गुलजारची शॉर्ट स्टोरी'- गुब्बारे', 'द अटॅक्स ओॅफ २६/११', 'नटसम्राट'.....त्यांच्या मुलाखती.....त्यात वाचलेल्या कविता, म्हटलेले डायलॉग्स........ हे जसं जसं पाहत गेलो तसं तसं "नाना काळजात घुसत गेले" असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कदाचीत माझं तापट डोकं, विनोदाची जळजळीत शैली आणि त्यातला सच्चेपणा या गोष्टींन्नी मला नानांच्या व्यक्तिमत्वात अक्षरशः बुडवून टाकलं.
कोणी त्यांना विक्षिप्त म्हणोत किंवा माथेफ़िरू तर कोणी ओवर अॅक्टींग की दुकान....माझ्या साठी नाना केवळ एक हाडाचा कलावंत.....एक सच्चा, निर्मळ माणूसच राहील. त्यांच्याच खास शैलीत सांगायचं झालं तर 'एक नागडं व्यक्तिमत्व'.
खूप दिवसांपासून नानांवर लिहायचं होतं आणि शेवटी त्यांच्या 'आपला माणूस' या चित्रपटाने माझ्यातल्या आळशी माणसाला मागे टाकून माझ्यातल्या नानाप्रेमीला बाहेर काढलंच. १० फ़ेब्रुवारीला आपला माणूस पाहण्याचा योग आला. त्यात नानांचा डबल रोल म्हणजे 'एकदम धुळाच'. 'काटकोन त्रिकोण' चा मला थोडाही गंध नव्हता म्हणून मी एका नवजाताप्रमाणे आपला माणूसला सामोरा गेलो. त्यात माझी बायकोही नानावेडी. मग काय समोर आमचं दैवत आणि त्यापुढे नतमस्तक आम्ही नानांचे भक्त. (आजकाल 'भक्त' शब्द उच्चारायला फार भीती वाटते!) नाना म्हणजे संपूर्ण स्क्रीनची व्याप्ती. आपलं प्रत्येक इंद्रिय हा मनुष्य आपल्याकडे आकर्षित करून घेतो. तिकडे नानांनी एखादा खुमासदार डायलॉग मारावा आणि इकडे बायकोची आणि माझी नजरानजर व्हावी आणि नंतर जोरदार हशा पिकावा हा नित्य नेमाचा खेळ झाला आहे. अनेकदा नाना अगदी माझ्या मेंदूत घुसून तिथे निर्माण होणारे संवाद समोर स्क्रीनवर साकारत आहेत या सारखी दुसरी गोड भावना नसते. अश्या संवादानंतरचं माझं बायकोला कोपरा मारणं आणि तिनं लगेच तिच्या हास्याद्वारे 'हो, कळलं, हा तुझ्याच डोसक्यातला डायलॉग होता' ही दाद देणं मला नानांच्या अजून जवळ घेऊन जाते. मग ती दाद नानांने हासडलेल्या एखाद्या शिवीला का असेना. नानांच्या तोंडी शिवीदेखील एक 'सुवर्णकमळ' भासते. नाना जेव्हा शिवी हासडतात तेव्हा असं वाटतं त्या बिचारीचा आत्ता कुठे उध्धार झाला. तिचं जीवन सार्थक झालं. उदाहरणार्थ आपला मणूस मध्ये मोजकी एकच शिवी नाना देतात ती म्हणजे 'भाडखाऊ'. मग ती शिवी पण आपली प्रेमीका भासू लागते.एखाद्या गोष्टीचा राग किंवा जी तगमग असते आपल्या मनात तो राग किंवा ती तगमग नाना या प्रेमीकेद्वारे अगदी लिलया व्यक्त करतात..... पडद्यावर किंवा पडद्यामागेही.
लहानपणी जसं मुलांना शुभं करोती, पसायदान वगैरे शिकवलं जातं तसं नानांनी मला काय शिकवलं किंवा त्यांच्या कोणत्या गोष्टी मला भावल्या?
१) क्रांतिवीर मधला इस्माईलला दिलेला 'समुपदेश' काय किंवा 'कलमवालीबाईला' केलेलं प्रोपोज काय .... किंवा त्याचा क्लायमॅक्स सीन (माझ्यासाठी हा खास सीन आहे कारण हाच सीन माझ्या मिमीक्रीमधलं पदार्पण ठरला) काय......'तिरंगा' मधला शिवाजीराव वागळेचे डायलॉग्स, द अटॅक्स ऑफ २६/११ मधील त्यांचा आणि कसाबचा सीन, खामोशीमध्ये एकही संवाद नसतानाही सबंध चित्रपटात वावरणारे 'बोलके नाना', 'कोहराम' मधले बंगाली पत्रकार असोत किंवा अगदी अलिकडचे 'आलू ले लो आलू' वाले कांदेविक्या नाना. नानांचं सगळंच कहर असतं.
२) त्यांची 'आप की अदालत' मधील बेधडक मुलाखत.
३) त्यांचा जिवलग मित्र विक्रम गोखले यांच्याविषयीचं किंवा इतर अभिनेत्यांच्या फिटनेसबद्दलचं परखड मत.
४) 'प्रहार' मध्ये विध्वेची भूमीका खरी वाटावी म्हणून माधुरीला अजिबात मेक-अप न करण्याचा सल्ला देणं. तिने गुपचूप थोडासा मेक-अप केलाय असे जाणवल्यास तिला ताबडतोब तोंड धुवायला जाण्यास भाग पाडणं.
५) 'नाम फ़ाऊंडेशन' च्या रुपाने त्यांनी (आणि मक्याने) जपलेली सामाजिक बांधीलकी. नेहमी समाजासाठी दान-धर्म करण्याची त्यांची निस्वार्थ व्रूत्ती.
६) त्यांच्या तोंडून अमोल पालेकरांच्या 'थोडासा रुमानी हो जाए' मधला डायलॉग ऐकणं म्हणजे नानाप्रेमींना एक पर्वणीच. ("हा मेरे दोस्त, वही बारिश, वही बारिश जो आसमान से आती है, बूंदों मैं गाती है, पहाड़ों से फिसलती है, नदियों मैं चलती है"). केवढं ते पाठांतर आणि किती सहज पण तितकंच आकर्षकरीत्या हा डायलॉग ते म्हण्तात.
७) अगदी साधं राहणीमान आणि नेहमीच उच्च विचार. असे विचार जे ते कधीही आणि कोणापुढेही निर्भीड्पणे मांडू शकतात. मांडणी पण अशी की त्यांचा प्रत्येक मुद्दा आपल्याला पटायलाच हवा. आपल्या एखाद्या वक्तव्याने बॉलीवूडमध्ये आपण कैक शत्रू (किंवा काही राजकारणी) तर बनवून घेत नाही आहोत ना अशी भीती कधीच त्यांच्या मनाला शिवत नाही.
८) त्यांच्या मनाला भावलेल्या लोकांबद्दल त्यांचं भरभरून बोलणं. मग ते माधूरीच्या सौंदर्याबद्दल असो किंवा स्मिता च्या अभिनयाबद्दल किंवा तिच्या सामाजिक जाणिवेबद्दल असो नाहीतर विजयाबाईंचं गुणगाण करणं असो. तुम्हाला ती व्यक्ति माहित नसेल तरीही केवळ नानांच्या वर्णनामुळेच तुम्ही त्या व्यक्तिच्या प्रेमात पडाल इतकं ते वर्णन प्रभावी असतं.
९) नानांमधला केवळ अभिनेताच नव्हे तर त्यांच्यातला कवी, लेखक, एक संवेदनशील माणूस, खेळामध्ये, व्यायामामध्ये रस असलेला, तितकाच शेतीमध्ये रममाण होणारा हा असा एकच अवलिया.
१०) त्यांची कॉलेजची अविस्मरणीय आठवण. कॉलेज कॅंटीन मधल्या चहावाल्याला त्या काळी ऑटोग्राफ घेऊन ठेवायला लावणे कारण नंतर ते खूप मोठे नट होऊन व्यस्त होणार ही खात्री असणे. स्वतःबद्दलचा केवढा मोठा हा आत्मविश्वास. हा आत्मविश्वास सत्यात उतरल्यानंतर पुन्हा त्याच चहावाल्याकढे जाऊन त्याचा चहा पिऊन त्याला आपला ऑटोग्राफ देणे. केवढं गोड रसायन आहे हे नाना म्हणजे.
११) नानांनी मला सगळ्यात जास्त प्रभावीत केलं असेल तर ते म्हणजे 'ग्रेट भेट' मध्ये निखील वागळेंना दिलेल्या त्यांच्या मुलाखतीद्वारे. नाना प्रत्येक विषयावर किती सखोल विचार करतात आणि आतून ते किती व्यथीत किंवा घायाळ होतात/आहेत हे प्रेक्षकांना कळलं. आम्हा नटांकडे ही आतली घुसमट व्यक्त करायला हे चित्रपटाचं माध्यम तरी आहे. थोड्यावेळाकरीता का होईना आम्ही त्यातून मुक्त तरी होतो पण सामान्य जनतेचं काय? त्यांनी कुठं आणि कसं मोकळं व्हायचं? की नेहमी असंच रडत कुढत एक दिवस मरून जायचं?
त्या मुलाखतीच्या शेवटी नाना म्हटले होते की ही जी काही मनातली मळमळ आहे ती सगळी मळमळ मी एका विडिओमध्ये शूट करून ठेवणार आहे. खूप मोठ्मोठ्या लोकांना त्यात मी अक्षरशः नागडं करणार आहे. मी मेल्यावर तुम्ही वाहिनीवाले तो विडिओ सगळ्या चॅनेल्सवर नक्की दाखवा. असा काहीसा आशय होता त्या सबंध मुलाखतीचा. ती मुलाखत संपली तेव्हा डोळे पाणावले होते आणि मन सुन्न झालं होतं.
असो. पुन्हा भोपळे चौकात येतो. नानांची दुहेरी भूमीका असलेला आपला माणूस मला खूप आवडला. नटसम्राटमधले 'अप्पा' आपला माणूसमधल्या 'आबांमध्ये' काही प्रमाणात झळकतात. 'तलवार' या बॉलीवूडपटाप्रमाणे एकाच प्रसंगाची सारासार अचूक मांडणी, नाना द ग्रेट व्यतिरीक्त सुमित आणि इरावतीचा सुरेख अभिनय आणि माझा लाडका दिग्दर्शक सतिश राजवाडे याचं उत्कृष्ट दिग्दर्शन या गोष्टी आपला माणूसच्या जमेच्या बाजू आहेत. अजय देवगनचं मराठी चित्रपटस्रुष्टीतलं प्रोड्यूसर म्हणून हे पदार्पण स्वागतार्ह आहे. या चित्रपटात, मूळ विषयाचं गांभीर्य पाहता गाण्यांचा जाणीवपूर्वक जपलेला अभाव हा आल्हाददायक आहे. नाहीतर आजकाल गाणी एखाद्या चित्रपटामध्ये विनाकारण एखाद्या अतिरेक्याप्रमाने कधी घूसखोरी करतील हे सांगता येत नाही. मराठी चित्रपटांच्या एकूणच सादरीकरणाचा दर्जा सध्या खूपच उंचावला आहे हे अलिकडेच पाहिलेल्या 'रमा-माधव', 'नटसम्राट', 'मुरांबा', 'फास्टर फेणे' आणि आता 'आपला माणूस' या चित्रपटांनी पुन्हा एकदा अधोरेखीत केलंय.
ज्या जाणकारांनी आपला माणूस पाहिलाय त्यांनी कृपया माझ्या खात्रीरुपी शंकेचं (शंका आमच्या सौं ची) निरसन करावं. अजय देवगन जो एकमेव शब्द उचारतो तेव्हा तो त्याचा आवज नसून सतिश राजवाडेने वॉईस डबींग केलेला आवाज आहे की त्याचा स्वतःचाच आवाज आहे हे कृपया सांगावे. माझ्या मते तरी तो आवाज अजयचा नसून सतिशचाच आहे.
चला, या लेखाचा शेवट मी नानांच्याच आवडत्या ओळींच्या आशयाने करतो. नाना नेहमी म्हणतात "आयुष्याच्या परतीच्या वाटेवर का होईना, आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, ही जाणीव आपल्याला होणे हीच केवढी मोठी गोष्ट आहे". तसंच मलाही वाटतं की परतीच्या या वाटेवर एकदातरी मला या आपल्या माणसाला भेटून कडकडून मिठी मारायची आहे आणि त्याला सांगायचंय की "बाबा रे, तुझा चहावाला म्हणून का होईना पण तू मला कायमचं तुझ्या जवळंच ठेवलंस तर माझं हे जीवन सार्थक होईल".
--------------- सुरज गायकवाड -----------------------