हे गणराया,
१) "पदोन्नतीच्या" अवतीभवती "पदलातीत्य" करुन-करुन संपूर्ण
"पदन्न्यासच" विसरून गेलो आहे. तेव्हा तुमच्या या सुकाळात हे
अडलेलं घोडं एकदाचं गंगेत न्हावू द्या.
२) 'अविवाहीत/ विना-आरक्षित ललनांची' नजर आमच्यावर पडू द्यात व
पडून ती टिकू द्यात व टिकून ती पुढे कायमस्वरुपी 'कामी' येऊ द्यात
म्हणजे पुढच्या वर्षी आपणास 'चार हातांचा' प्रणाम स्विकारण्यास
सज्ज राहता येईल.
३) आमच्या मित्रांना (व मैत्रिणींना) आमचा वेडा स्वभाव पेलण्याची ताकद
द्या…धैर्य द्या…त्यांचा धीर वाढवा.
४) त्यांना ही मौलीक शिकवण द्या की 'भ्रमणयंत्र' हे या पामर
मित्राकरितासुद्धा वापरावयाचे असते. त्याचा
उपयोग केवळ काही 'राखीव' व्यक्तींसाठीच नसतो याचं सतत त्यांना
भान असू देत.
(अजून काही विसरलो असल्यास पुढच्या ८ दिवसांमध्यॆ नक्की सांगेन…)
तुझा भक्त,
~ सुरज~
< सर्व गणेशभक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा !!! >
- लोकांना तुझ्यापुढे 'श्रवनणीय' गाणी लावण्याची सुबूद्धी दे !
- त्यांना आर्त्या पाठ नसतील तर निदान वाचून तरी अचूकपणे म्हणावयास लाव.
- अवाजवी भपका टाळून त्याची जागा श्रद्धेनं घेउ दे.
- खरी श्रद्धा ही मनाच्या गाभाऱ्यात निर्माण होते व ती भव्य-दिव्य आरास/देखावे उभे करून किंवा महागडे मिष्ठांन्ने नैवेद्य म्हणून अर्पण करून या द्वारे ती कधीच व्यक्त होत नाही याचा साक्षात्कार लोकांना घडू देत.
( काही खाजगी मागण्या !!! )